सोलापूर प्रतिनिधी | शिवाजी महाराज यांचा इतिहास चौथीच्या पुस्तकातून काढण्याच्या हालचालीवर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. भाजप सरकारकडून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचे काम सुरु असल्याचं म्हणत पवार यांनी भाजप सरकारव कडाडून टिका केलीय.
शिवाजी महाराज हे देशाचे आदर्श राजे होते. त्यांचे आदर्श विचार तरूण पिढीला कळावेत यासाठी पूर्वी पासूनच शालेय पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांचा आदर्श विचार, त्यांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा समावेश होता. शिवाजी महारांच्या आदर्श विचार घेऊनच तरूण पिढी घडली आहे. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारच भाजप सरकारने चौथीच्या पुस्तकातून वगळले आहेत.
शिवाजी महाराजांच्या विचारापासून तरूण पिढीला वेगळ करण्याचं पाप हे सरकार करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी आज पंढरपुरात बोलताना केला. राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचार सभेत आज शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या धड्यावरून भाजप सरकारवर सडकून टीका केली.