Indian Navy Day | कुठल्याही देशात सैन्य दलाला अन्यन साधारण महत्त्व असते. सैन्य दलाच्या वेगवेगळ्या शाखाही असतात. पण, ज्या देशांना समुद्री किनारा आहे त्या देशातील नौदलाला तर खूप सर्तक राहावे लागते. आज (4 डिसेंबर) भारतीय नौदल दिन आहे. जगातील शक्तीशाली नौदलामध्ये भारतीय नौदलाचा क्रमांक सातवा आहे. त्यामुळेच आपले शत्रूराष्ट्र आपल्याला घाबररून राहतात.
भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत ही सामील आहे. अण्वस्त्र आव्हानाला तोंड देण्याची क्षमता असलेल्या या आयएनएस अरिहंतची निमिर्ती कलपक्कम येथील ‘इंदिरा गांधी सेंटर फॉर अँटोमिक रिसर्च’ येथे ‘भारतीय नौदल’ आणि ‘संरक्षण संशाधक आणि विकास ऑर्गनायझेशन’ने एकत्रित प्रयत्नांतून करण्यात आली आहे. आयएनएस विराट आणि आयएनएस विक्रमादित्यमुळे भारतीय नौदल जगात सातव्या क्रमांकावर आहे.
भारतीय नौसेनेकडे एकूण 55 युद्धनौका आणि 58,350 सैनिक आहेत. कोरियाच्या नौदलाप्रमाणे भारतीय नौदलही 2020 पर्यंत ब्ल्यू वॉटर क्षमता प्राप्त करण्याचे ध्येय आहे. भारताकडे 9 विध्वंसक, 15 नौका, न्यूक्लिअर हल्ला करणारी एक पानबुडी, 14 पारंपारिक पाणबुडीसह आधुनिक शस्त्र आहेत.