भारताला मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवतेय ; वाढदिवसानिमित्त राहुल गांधीनी दिल्या डॉ.मनमोहन सिंग यांना खास शुभेच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांचा आज ८८ वा वाढदिवस आहे. २००४ ते २०१४ या कार्यकाळात मनमोहन सिंग यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषविले होते. मनमोहन सिंग हे अर्थतज्ज्ञ आहेत. आज मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. देशाला त्यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवत असल्याचं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

“भारताला मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवत आहे. त्यांचा प्रामाणिकपणा, सभ्यता आणि समर्पण आम्हा सर्वांसाठी प्रेरणा आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा,” असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

यासोबतच डॉ.मनमोहन सिंग यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. मनमोहन सिंग 10 वर्ष देशाचे पंतप्रधान होते. तसेच २००४ मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी मनमोहन सिंग १९९८ ते २००४ पर्यंत राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदी होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’