हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जगभरात कोरोनाचे संकट पसरले आहे. भारतात सुद्धा कोरोना दिवसेंदिवस वाढतच आहे. सगळीकडे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अश्यातच भारतात एक आनंदाची बातमी आली आहे. भारताच्या लेकींनी कमाल करत मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा लघु ग्रह शोधून काढला आहे. गुजरात मधील दोन विद्यार्थिनींची हि गरुड झेप आहे . नासाने नेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. HLV २५२४ असे या लघुग्रहाचे नाव आहे.
वैदयी वैकारिया आणि राधिका लाखनी अश्या या दोन विद्यार्थिनींची नावे आहेत. या दोघी गुजरातमधील सुरत येथील पीपी सावनी चैतन्य विद्यालय संकुल येथे शिकतात राधिका हिने खगोलशास्त्र विषयीचे शिक्षण स्पेस रिसर्च सेंटर मधून घेतले होते. त्या दोघीनी केलेले संशोधन नासाशी संबंधीत अखिल भारतीय लघुग्रह शोध मोहीम संबंधित होत. नासाने इमेल द्वारे या संशोधनाला दुजोरा दिला आहे. आणि या दोघींचे कौतुक पण केले आहे.
ऑल इंडिया ऍस्ट्रोनाइट सर्च कंपनीचे संचालक डॉक्टर पॅट्रीत मिल यांनी हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ आहे आणि तो कधीही पृथ्वीला क्रॉस करून जाऊ शकतो असं म्हंटल आहे. राधिका हि भावनगर जिल्यातील रहिवासी आहे तर वैदही हि अमनेर मधील राहणारी आहे. आम्ही अंतरिक्षात २० पदार्थ यांना चिन्हित केलं होत. देशात चार वर्षानंतर लघुग्रह शोधण्याचं काम झालं आहे.