मुंबई | वादग्रस्त विधाने करुन सतत चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजी भिडे यांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकरांवर वादग्रस्त विधान केले आहे. डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहील्याचा दावा भिडे यांनी केला आहे. संभाजी भिडेंच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे.
न्युज १८ या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली’ असं संभाजी भिडे बरळले आहेत. ‘मनू हा जगातला पहिला कायदेपंडित होता’ असे स्वत: आंबेडकरांनीच लिहून ठेवले असल्याचेही भिडे यांनी म्हटले आहे. देश विदेशातील विद्यापिठांत मनुचा अभ्यास केला जातो असे म्हणुन भिडेंनी मनुचं कौतुक केले आहे.
शिवाय सदर मुलाखतीत संभाजी भिडेंनी कोरेगाव भोमावर भाष्य करतेवेळी मिलिंद एकबोटे वरिल सर्व आरोप धुडकावून लावले आहेत. तर कोरेगाव भिमा येथील दंगल संभाजी ब्रिगेडनेच घडवून आणल्याची टीका यावेळी त्यांनी केली आहे.