भुसावळ | मालगाडीचे डबे रुळावरून घसरले; वाहतूक विस्कळीत

0
95
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भुसावळ | जळगाव-भुसावळ सेक्शन दरम्यान मालगाडीचे सहा डबे घसरले आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, मालगाडीचे डबे घसरल्याने मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे.

आज सकाळी ७.३०च्या सुमारास ही घटना घडली. भुसावळ-नागपूर-दिल्ली मार्गावर भुसावळ येथे मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली. मात्र, ही मालगाडी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सध्या मालगाडीचे डबे पुन्हा रुळावर आणण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हे काम कधीपर्यंत पूर्ण होईल याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली नाही. मात्र, दुपारपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, मालगाडीचे डबे घसरल्याने या मार्गावरील वाहतूक तात्काळ दुसऱ्या मार्गावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here