क्रीडानगरी | मँचेस्टर युनायटेडचा स्टार गोलकीपर सर्जीओ रोमेरो याच्या लंबोरगिनी गाडीचा इंग्लंडमधील कॅरिंगटन प्रांतात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. सर्जीओ रोमेरो मात्र अपघातातून सुखरूप बचावला आहे.
हा अपघात इतका भीषण होता की रस्त्याच्या बाजूला असलेले लोखंडी रेलिंग तोडून गाडी पुढे गेली. अपघात झाल्यानंतर प्रसंगावधान दाखवत लगेच रोमेरो बाहेर पडला. त्यामुळे रोमेरोला काहीच दुखापत झाली नाही.
अपघातानंतर ही गाडी क्रेनने उचलून नेण्यात आली. अपघातग्रस्त गाडीचे फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपण सुखरूप असून चाहत्यांनी काळजी करु नये असं आवाहन रोमेरो याने केलं आहे.




