मंत्रालयासमोर महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न

Thumbnail 1533111975141
Thumbnail 1533111975141
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | जमिनीचा निकाल आपल्या विरोधात लागला या नैराश्यातून एका महिलेने मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. मंत्रालयाच्या गेट वर असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान दाखवल्याने त्या महिलेचा जीव वाचला असून मरीन ड्राइव्ह पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेतले आहे. राधाबाई साळुंखे असे या अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा नवीन पायंडाच महाराष्ट्रात पडतो आहे. या आधीही बऱ्याच लोकांनी मंत्रालयाच्या समोर आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. राधाबाई साळुंखे या बीडच्या रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.