पिंपरी चिंचवड | वीर चाफेकर बंधूंच्या स्मृती संग्रहालयाच्या भूमी पूजनाला मुख्यमंत्री आज पिंपरी चिंचवड मध्ये येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला येऊ नये आणि आल्यास कार्यक्रम उधळून लावू असा इशारा मराठा क्रांन्ति मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काल दिला होता. मराठा आरक्षणासंदर्भात कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी पोलिसांनी पन्नास आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने ठोक आंदोलनाचा पवित्रा घेतला असून आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासही आंदोलकांनी अटकाव केला होता. वारकऱ्यांच्या सुरक्षते साठी मुख्यमंत्र्यांनी एक पाऊल मागे येत महापुजेला न जाण्याचा निर्णय घेतला होता. दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा प्रश्न चिगळत चालला आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलक तीव्र पवित्र्यात आहेत. राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडत आहे म्हणून यावर लवकरात लवकर तोडगा निघावा असा सूर जनमानसातून उमटत आहे.