मुंबई प्रतिनिधी । ‘राज्यात विधानसभा निवडणुका ईडी मार्फत सुडाच राजकारण करणं योग्य नाही’ असं मत मराठा क्रांन्ती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला आहे. मात्र, महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून पवारांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार मराठा समाजातून येणारे मोठे नैतृत्व आहे. तेव्हा इतर राजकीय पक्षातील नेत्यांसोबतच मराठा क्रांती मोर्चा सुद्धा पवारांच्या बाजूने उभा असल्याचे सूचक मत आज आबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
‘शरद पवार यांना ईडी प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न राज्यातील जनतेला पटलेला नाही तसेच कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्यांना ही पटलेला नाही. तसेच मराठा क्रांती मोर्चा शरद पवारांसोबत आहे.’ असेही त्यांनी सांगितले. भाजपचे राज्यातील वरिष्ठ नेते एकनाथ खडसे सोबतच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही शरद पवार यांच्यावर दाखल केलेला चुकीचा आहे असे म्हंटले आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ही या ईडीच्या चौकशीबाबत योग्य निर्णय नसल्याचे सांगितले आहे.
शरद पवार यांना मिळणार वाढता पाठिंबा पाहता येणाऱ्या विधानसभेत त्यांना सहानुभूतीचा फायदा मिळणार का? तसेच भाजप पक्षावर राजकीय सूडबुद्धीचा होणार आरोप कितपत खतपत त्यांना हानी पोहोचवणार हे येणाऱ्या काही दिवसात दिसून येईल. तूर्तास आज ईडी कार्यालयात खुद्द शरद पवार हे प्रकाणावर हवी ती माहिती देण्यास जाणार होते मात्र, ईडीने त्यांना सध्या चौकशीची गरज नसल्याचे त्यांना मेल पाठवून कळवले होते. सोबतच पवारांनी पोलिसांना सहकार्य म्हणून ईडी कार्यालयात जाणे रद्द केले.