मुंबई : काल पालकमंत्री पदाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र मला कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्री पद नको अशी भूमिका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. पालकमंत्री पदाचे वाटप होण्यापूर्वी देखील त्यांनी हे मत व्यक्त केले होते.
कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांची अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देऊन नगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी काँग्रेसच्या एखाद्या मंत्र्याची नियुक्ती करावी अशी मागणी बाळासाहेब थोरात मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. बाळासाहेब थोरात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील.
पालकमंत्र्यांची यादी तयार करताना थोरात यांना विश्वासात घेण्यात आलेले नाही. त्यांची नियुक्ती करताना आणि त्यांच्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नियुक्तीही परस्पर झाल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.