महाजनादेश यात्रा ;कॅबिनेट मंत्र्याच्या आढावा बैठकीला पक्षातील आमदाराची दांडी .

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा परभणी जिल्ह्यात आली असून तर दुसरीकडे 28 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाेणाऱ्या महाजनादेश यात्रेनिमित्ताने राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हात तीन ठिकाणी आढावा बैठकीचे आयोजन ठेवले होते. गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी यापैकी पाथरी मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक भक्तीनिवास येथे ठेवण्यात आली होती. या बैठकीला पाथरी मतदारसंघाचे आमदार मोहन फड व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने ही बैठक चर्चेचा विषय झाली आहे. याउलट सेलू येथे झालेल्या आढावा बैठकीमध्ये बोर्डीकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकार्‍यांनी उपस्थिती लावत मुख्यमंत्र्याच्या सभेची तयारी केली आहे . मागील आठ दिवसांपासुन बोर्डीकर गावोगावी भेठी ही देत आहेत.

जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघ युतीच्या वाटाघाटींमध्ये शिवसेनेचे वाट्याला आहेत. त्यापैकी जिंतूर ,पाथरी, परभणी येथे 28 ऑगस्ट महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या तीनही ठिकाणी भाजपने आपला दावा केला आहे. विशेष म्हणजे पाथरी मतदारसंघांमध्ये मोहन पुढे यांच्या रूपाने भाजपचा आमदार आहे .गुरुवारी दुपारी पाथरी येथे भक्तनिवास मध्ये झालेल्या बैठकीमध्ये महाजनादेश यात्रेचे नियोजन करण्यासाठी आढावा बैठकीत मोहन फड यांची उपस्थिती महत्त्वाची होती. शिवसेना या जागेसाठी आग्रही असून ही जागा भाजपला सोडण्यास कुठल्याही परिस्थितीत त्यांची तयारी नाही. बहुदा हीच गोष्ट आ. मोहन फड लक्षात आली असून मागील लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार संजय जाधव यांच्या विरोधात प्रचार केल्याचा फटका त्यांना बसु शकतो. नुकत्याच झालेल्या शिवसेनेना पदाधिकारी यांच्या स्नेहमिलन कार्यक्रमात लोकसभा निवडणूकीत गद्दारी केलेल्यांना माफी नाही असा सूचक इशारा खासदार जाधव यांनी अप्रत्यक्षरित्या आ. मोहन फडांना दिलायं.

मतदारसंघ भाजपला सोडण्यासाठी खासदार जाधव यांच्यासह शिवसैनिक तयार नाहीत. युती झाल्यास अपक्ष लढल्याशिवाय पर्याय नसल्याचे आमदार मोहन फड यांच्या लक्षात आल्याने, एकला चलो रे अशी भूमिका आ. फड यांची असु शकते. अशी कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज आहे.मागील निवडणुक ही ते अपक्ष लढवून निवडूण आले होते.

दरम्यान आ . फड हे मुंबईला असल्याने आढावा बैठकीला न आल्याची ही चर्चा होती मात्र त्यांचा प्रतिनिधी अथवा कार्यकर्त्यांनी हि बैठकीस अनुस्थिती ठेवल्याने आ .फड यांच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीस दांडी मारल्याची सर्व मतदार संघात चर्चा आहे .

Leave a Comment