कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापुरातल्या महापुराचा फटका जिल्ह्यातील अनेक गुऱ्हाळघरांना सुद्धा बसला आहे. अनेक गुऱ्हाळघर अक्षरशः पाण्यात वाहून गेल्याने त्यांची नव्याने उभारणी करावी लागणार असल्याने गुऱ्हाळघर मालक चांगलेच अडचणीत सापडले आहेत. यासाठी शासनाने विशेष तरतूद करून आम्हाला आर्थिक मदत करावी, कर्जमाफी सुद्धा करावी यासाठी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे नदीकाठी असणारी गुऱ्हाळघर अक्षरशा जमीनदोस्त झाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 400 हुन अधिक गुऱ्हाळ घर आहेत. यातील बहुतांश गुऱ्हाळांना महापुराचा फटका बसला आहे. हि गुऱ्हाळे पुन्हा नव्याने उभे करण्याचे मोठे संकट आता या घराच्या मालकांचा समोर पडला आहे. जवळपास आठ ते दहा दिवस पूर्णपणे पाण्यात राहिल्यामुळे संपूर्ण गुऱ्हाळ उध्वस्थ झाले आहेत. व्यवसाय नव्याने उभे करण्याचा संकट यांच्यावर आले आहे. ‘त्यामुळे शासनाने घरमालकांना विशेष तरतूद करून आर्थिक मदत करावी. ज्यांची व्यावसायिकांनी कर्ज काढून ही गुऱ्हाळघर उभी केली आहेत त्यांची कर्जमाफी करावी’ या मागणीची बैठक आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार पडली. यात शेतकरी आणि गुऱ्हाळघर मालकांची बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. शिवाय या मागण्यांचे निवेदन सुद्धा यावेळी बाजार समितीकडे देण्यात आले.