महाराष्ट्र होऊ शकेल आंतरराष्ट्रीय विमानसेवांचा हब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | क्षमता असतानाही मुंबई, पुणे व नागपुरातील दोन सेवा वगळता राज्यातून फार आंतरराष्ट्रीय सेवा नाहीत. यामुळेच आता राज्य सरकारने तीन ठिकाणांहून नव्याने आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या नियोजनानुसार सुरू झाल्यास महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय विमानसेवांचा हब होऊ शकणार आहे.

विदेशातील भक्तगणांना शिर्डी, नांदेड व कोल्हापूर या राज्यातील प्रसिद्ध तिर्थस्थळांपर्यंत आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे हवाई क्षेत्रात गुंतवणूक येईल. तसेच पर्यटन क्षेत्रालासुद्धा चालना मिळू शकणार आहे. या तीन शहरांना त्यांना जगाशी जोडण्यासाठी नव्याने कार्यान्वीत झालेल्या तेथील विमानतळांवरून आंतरराष्ट्रीय सेवा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. विदेशातील भक्तांना भारतात आणण्यासाठी शिर्डी-कौलालम्पूर सेवा लवकरच सुरू होणार आहे. त्याखेरीज नागपूर-सिंगापुर सेवा सुरू करण्यासाठीही विमानसेवा कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

मुंबई व पुणे ही राज्यातील महत्त्वाची आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. त्याखेरीज महाराष्ट्रात नागपूर आणि औरंगाबादलासुद्धा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा आहे. पण तसे असतानाही आैरंगाबादहून एकही विमानसेवा नसल्याने संपूर्ण मराठवड्यातील प्रवाशांना विदेशात जायचे असल्यास मुंबई किंवा पुण्याला यावे लागते. यासाठीच औरंगाबाहून पहिल्या टप्प्यात बँकॉक किंवा टोक्योला सेवा सुरू करण्याची निवीदा जाहीर होणार आहे. त्यामुळे अाैरंगाबादजवळ असलेल्या अजिंठा व वेरूळ येथील पर्यटन क्षेत्राचा आर्थिक विकास होऊ शकणार आहे.

उडान अंतर्गत कोल्हापूर व जळगावहून एअर डेक्कनने सेवा सुरू केली होती. पण कंपनीचा परवाना डीजीसीएने रद्द केला. त्यामुळे या दोन शहरांना मुंबईशी जोडणाऱ्या सेवा बंद झाल्या आहेत. पण या शहरांच्या सेवा पुन्हा सुरू होण्यासाठी नव्याने निवीदा काढल्या जाणार आहे. त्याद्वारे कोकणातील अर्थकारणला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Leave a Comment