सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
रासप विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेबरोबर राहणार असून फलटण उत्तर कोरेगाव मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही माणची जागा आमची शान आहे. फलटणची जागा आमची जान आहे ही निवडणूक आमच्या प्रतिष्ठेची आहे असे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केले
येथील महाराजा मंगल कार्यालयात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन महादेव जानकर यांच्या उपस्थित करण्यात आले होते यावेळी शेळी मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगम्बर आगवणे ,रासपचे जिल्हाप्रमुख मामुशेठ वीरकर आदी उपस्थित होते
मी माढा लोकसभा मतदार संघातून ज्यावेळी निवडणूक लढवली होती त्यावेळी फलटण आणि माळशिरस तालुक्याने मोठी साथ मला दिली होती त्यांनंतर पक्षाचे मोठे संघटन वाढविण्याची जवाबदारी स्थानिक पदाधिकारी यांची होती मात्र संघटन वाढविण्यात पदाधिकारी कमी पडल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करून या पुढील काळात पक्षाची ताकद वाढली गेली पाहिजे नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य निवडून आले पाहिजे याचे भान पदाधिकाऱयांनी ठेवावे असे खडे बोल महादेव जानकर यांनी सुनावले
आम्ही जागा वाटपात 10 जागा मागूनच घेणार आहे आमची 57 जागा लढविण्याची तयारी आहे रासपाला चार राज्यात मान्यता मिळाली आहे एकीकडे रासपची सर्वत्र मान्यता वाढत असताना राष्ट्वादीची मान्यता कमी होत चालली आहे आपला पक्ष मोठा होत असून कार्यकर्त्यांना चांगल्या पदावर संधी दिली आहे फलटनची जागा रासप सोडणार नाही या जागेवर आमचे उमेदवार दिगम्बर आगवणे हेच असणार आहे असे जानकर यांनी स्पष्ट केले
आपली ताकत आपण ओळखली पाहिजे समाज का मागे राहिला याचे आत्मचिंतन करा भाजपा बरोबर सरकार मध्ये सामील होताना धनगर समाजाला आरक्षण मिळावे,सोई सुविधा मिळाव्यात हा हेतू होता सरकारने त्या दृष्टीने निश्चितच पावले टाकली आहेत महादेव जानकर यांनी मोठा संघर्ष करून पक्ष वाढविला आहे कार्यकर्त्यांनी आता निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागावे जागा वाटपात फलटनची जागा रासपकडेच येणार आहे दिगंबर आगवणे हेच सर्व संमतीने उमेदवार असणार असल्याचे बाळासाहेब दोडतोले यांनी स्पष्ट केले.