नवी दिल्ली | सुनिल शेवरे
आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय राजकारणात वेगाने घडामोडी होत आहेत. एकीकडे मोदी आणि अमित शहा वेगवेगळ्या राज्यात शहरात जाऊन विकासाचा आढावा घेण्यासाठी दौरे करत आहेत तर एकीकडे मायावती आणि अखिलेश भाजप ची डोकेदुखी ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी कर्नाटकाच्या निवडणुकीत एच.डी. देवेगौडा यांच्या पक्षाशी म्हणजेच जनता दल (सेक्युतर) सोबत युती केली होती. त्यावेळी काँग्रेस ला राष्ट्टीय पातळीवर बसपा शी युती करण्याची आशा निर्माण झाली होती कारण देशभरात बसपाचा मतदाराचा वाढता कल पाहता काँग्रेस ची डोकेदुखी ठरत आहे हे काँग्रेस जाणून होती.
एखाद्या राष्ट्टीय पक्षाचं प्रस्थ जर कमी करावयाचे असेल तर त्या पक्षाशी युती करून त्या विचारधारेला अप्रत्यक्ष आव्हान देण्याची उदाहरणे अनेक देशात अनेक देता येईल. मायावती मात्र याला अपवाद ठरत काँग्रेसच्या आशेला सुरुंग लावत त्यांनी काँग्रेस कडे सपशेल दुर्लक्ष केलं आहे. बसपाचा जो मतदार वर्ग आहे तो उत्तर प्रदेशच नव्हे तर इतर राज्यातही आहे तसा टिकून आहे किंबहूना तो किंचित वाढला सुद्धा असेल.
महाराष्ट्रातील बसपा च्या मतदारांचा विचार करता अनेक बसपा केडर बेस कार्यकर्ते नसलेल्याना वाटत असेल मायावती महाराष्ट्रात युती का करत नाही. याचं कारण ही तसेच असेल महाराष्ट्रात कांशीराम यांनी आंबेडकरवाद सांगण्याच्या काळ लोटून गेला महाराष्ट्राने त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला नाही. त्याचाच धागा पकडत मायावती या कांशीराम यांच्या शिष्य असल्याने या गोष्टी त्यांनी बहुधा शिकून घेतलं असणारच. फार तर त्या विदर्भ सारख्या प्रांतात युती करतील परंतु बसपा च्या विचार धारेशी मिळती जुळती विचारधारेचा पक्षाचा महाराष्ट्रात अभाव आहे. त्यामुळे युतीचा हा खेळ महाराष्ट्रात खेळू शकत नाहीत.
राहिली गोष्ट पश्चिम महाराष्ट्राची यामध्ये कारखानधारांचा प्रदेश म्हणून ओळख असलेल्या पश्चीम महाराष्ट्रात राष्ट्रवादीसारख्या काँग्रेसचा बी टीम असलेल्या पक्षाचं वजन त्यामानाने जास्त आहे. राष्ट्रवादी सारखा धर्मनिरपेक्ष पक्षाशी युती होण्याला फारसा वेगळं काही वाटणार नाही. परंतु मायावती या सहजाहजी युती करणाऱ्या नेत्या नाहीत त्या दूरदृष्टी असलेल्या नेत्या असल्याने कोणत्याही पक्षाशी युती करताना सामान्य कार्यकर्त्यांची फरपट तर होणार नाही ना इथपर्यंत त्या विचार करीत असतात आणि आपलं नुकसान होणार नाही ना याकडे त्यांचा पुरेपूर प्रयत्न असतो.
२०१९ ची लढाई अटीतटी ची असणार यात काही शँका नाही. परंतु मायावती या पंतप्रधानपदा साठी काँग्रेसची कोंडी करत आहेत का तर राजकीय दृष्टीकोनातून काही अंशी उत्तर तूर्तास तरी होय हेच मिळेल.