मारुती सुझुकीने केली ३ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची कपात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र | सध्या भारतीय बाजारावर मंदीचे सावट आहे.या मंदीचा फटका ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला सुद्धा बसला आहे. नुकतेच मारुती-सुझुकीने 3 हजारपेक्षा अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. गेल्या दोन दशकांमध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री पहिल्यांदाच मंदीचा सामना करत आहे. याआधी 2000 मध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला मंदाचा फटका बसला होता.
मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर सी भार्गव वृत्तवाहिन्यांना माहिती देतांना म्हणाले की, “मंदीमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कंत्राटाचे नुतनीकरण करण्यात आलेले नाही. सध्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांवर कोणताही परिणाम झालेला नाही. बाजारातील मंदी हा व्यवसायाचा एक भाग आहे. जेव्हा मागणी वाढते तेव्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले जाते. जेव्हा मागणी घट होते तेव्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाते.सध्या मारुती सुझुकीने ३ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.”

ऑटोमोबाईल सेक्टर अर्थव्यवस्थेमध्ये अनेक नोकऱ्या निर्माण करतो. विक्री, सेवा, इन्शुरन्स, लायसन्स, फायनान्स, अॅक्सेसरीज, ड्रायव्हर, पेट्रोल पंप आणि ट्रान्सपोर्टेशन यामध्ये मंदीमुळे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या प्रभावित होणार आहेत. कल्पनेपलिकडे या क्षेत्राला मोठा फटका बसणार असल्याचे सुतोवाच भार्गव यांनी केले. यंदा तिसऱ्या आणि चौथ्या तिमाही मध्ये काही सकारात्मक प्रभाव दिसून येऊ शकतो. तसेच 2021 मध्ये काही बदलही दिसण्याची शक्यता आहे. चांगल्या पावसामुळे ग्रामीण भागात कार विक्री वाढू शकते, असा अंदाजही भार्गव यांनी व्यक्त केला.

Leave a Comment