मुंबई | मराठा आरक्षणाचे लोन महाराष्ट्र भर पसरले असून आज मुंबई येथे मराठा समाजाने चक्का जाम आंदोलन केले. सकाळी जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर लोकल रोखून आंदोलन करणयात आले तर वाशीमध्ये मोठया प्रमाणात रस्त्यावर चक्का जाम करून मराठा समाजाने असंतोष दर्शवला आहे.
मराठा आंदोलकांनी आज मुंबईकरांनी रस्त्यावर पडू नये असा इशारा दिला होता. तरीही जे मुंबईकर रस्त्यावर आले त्यांचा मार्ग आंदोलकांनी रोखला. बस रिक्षा मोठया प्रमाणावर फोडण्यात आल्या आहेत. नवी मुंबई मधील ठिय्या आंदोलन आद्यप ही सुरूच आहे.
मराठा आंदोलना बाबत सरकार कसलीच भूमिका घेत नसल्याने आंदोलक हिंसक कार्यवाहि करत आहेत. तसेच सरकार आषाढी महापूजा प्रकरणा पासून आंदोलकांच्या बाबतीत उदासीन आहे.