नवी दिल्ली | मराठा समाज आपला आक्रोश आंदोलनातून मांडत आहेत तर भाजपचे नेते त्यांना चेतावणी देत आहेत. यातून अंदोलनाचा भडका उडत आहे. सत्तेवर येताना आम्ही दोन महिण्यात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असे छातीठोकपणे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांना तेव्हा न्यायालय दिसत नव्हते का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी केला आहे. गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजवले आहेत. भार झेपत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असा सणसणीत टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
कालच शरद पवार यांनी आंदोलन भडकण्याला सरकार दोषी असल्याचे म्हणले होते तसेच सरकारने यावर लवकरत लवकर तोडगा काढावा अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होईल असे शरद पवार म्हणाले होते त्याच धाग्याला पकडून सुप्रिया सुळे यांनी आज मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.