नागपूर | मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित असलेला औरंगाबाद कचरा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि औरंगाबाद चे मनपा आयुक्त व महापौर यांच्यात नागपूर येथे नुकतीच बैठक पार पडली. सदर बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘कचरा प्रश्न सोडवला नाही तर औरंगाबाद महानगर पालिका बरकास्त करीन’ असा अौरंगाबाद म.न.पा. ला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
औरंगाबाद मनपावर भाजपचीच सत्ता असून देखील मुख्यमंत्र्यांनी पालिकेला असा इशारा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागील पाच महिन्यापासून औरंगाबादचा कचरा प्रश्न गंभीर झाला असून शहरामध्ये १४ लाख टन कचरा साठला आहे. कचऱ्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य माजले असून दुर्गंधी, डास अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
मनपाचा नाकर्तेपणा लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजत आहे. पुढील काही दिवसात कचरा प्रश्न सुटला नाही तर औरंगाबाद मनपा बरकास्त होणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले आहे.