नागपूर | दूध दरवाढीच्या आंदोलनापुढे सरकार झुकले असून दुधाला २५ रुपये दर देण्याची घोषणा महादेव जानकर यांनी विधानसभेत केली आहे. विधानसभेच्या अध्यक्षांच्या दालनात सर्व पक्षीय नेते, मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्यात झालेल्या चर्चेत हा तोडगा काढण्यात आला आहे. २१ जुलै पासून हा नवा दर लागू करण्यात येणार आहे.
सरकार ५ रुपये दूध संघाला देणार आणि दूध संघ शेतकऱ्यांना २५ रुपये प्रति लिटर या प्रमाणे दुधाला दर देणार असा निर्णय झाला आहे. जो दुधसंघ २५ रुपयांनी दुधदर देणार नाही त्या दूध संघावर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजू शेट्टी यांच्यात रात्री उशिरा एक बैठक पार पडणार आहे. त्यात दूध आंदोलनावर सखोल चर्चा होणार आहे आणि त्यानंतर शेट्टी संप मागे घेण्याची शक्यता आहे.