मोदी सरकार पुन्हा एकदा PPFच्या व्याजदरांमध्ये कपात करण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मोदी सरकार पुन्हा एकदा अल्प मुदत बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरांमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि परताव्याची हमी समजली जाणारी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)स्कीमवर पहिल्यांदाच सात टक्क्यांपेक्षा कमी व्याज होऊ शकतो. पुढील आठवड्यात तिमाहीचे दर निश्चित केले जाण्याची शक्यता आहे, त्यात पीपीएफचा व्याजदर सात टक्क्यांपेक्षा कमी केला जाऊ शकतो.

जर पीपीएफच्या दरांमध्ये अपेक्षेनुसार कपात झाली तर 1974 नंतर पीपीएफचा व्याजदर सात टक्क्यांपेक्षा खाली जाण्याची ही पहिलीच वेळ असेल. पीपीएफचे व्याजदर सात टक्क्यांपेक्षा कमी होण्याची 46 वर्षांमधील ही पहिलीच वेळ असेल. प्रत्येक तिमाहीच्या सुरुवातीला पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनासंह तमाम योजनांचे व्याजदर निश्चित केला जातो.

सध्या पीपीएफवर 7.1 टक्के व्याजदर मिळत आहे.एप्रिल ते जून तिमाहीसाठी हे दर मार्च महिन्याअखेरीच्या आठवड्यात निश्चित करण्यात आले होते. याआधी जानेवारीपासून मार्च महिन्याच्या तिमाहीमध्ये हा दर 7.9 टक्के होता. याशिवाय ज्येष्ठ नागरिक बचत योजनांच्या व्याजदरातही मोठी कपात झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना आपल्या बचतीवर 8.6 टक्क्यांऐवजी 7.4 टक्केच व्याज मिळत आहे.

तसंच नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटच्या व्याजदरात वेगाने कपात होत 7.9 टक्क्यांपेक्षा कमी होऊन 6.8 टक्के झाली होती. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदरही 8.4 टक्क्यांऐवजी 7.6 टक्के झाला आहे. गुंतवणूक रक्कम दुप्पट करण्यासाठी चर्चेत असलेल्या किसान विकास पत्र योजनेवरही व्याजदर आता 6.9 टक्केच मिळणार आहे आणि याचा मॅच्युरिटी पीरियड वाढून आता 124 महिने झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment