नवी दिल्ली | तेलगू देसम पार्टीच्या वतीने मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर आज लोकसभेत मतदान होणार आहे. मोदी सरकार वरील गेल्या चार वर्षातील हा पहिला अविश्वास ठराव आहे. आजच्या ठरावाचा काय निकाल लागणार या कडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.
आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मुद्दयावर तेलगू देसम पार्टीने मागील अधिवेधनात अविश्वासाची नोटीस लोकसभेच्या सभापतींना दिली होती. सभापती सुमित्रा महाजन यांनी हा निर्णय राखून ठेवला होता. अखेर या ठरावाला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभापतींनी मंजूर केल्याने अधिवेशन सुरळीत चालण्यास मदत झाली.
” संसदीय लोकशाही व्यवस्थेतील आज महत्वाचा दिवस आहे आणि माझे सहकारी खासदार योग्यवेळी उपस्थित राहून योग्य निर्णय घेतील.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून सांगितले आहे.