मुंबई | स्मार्टफोन, स्मार्टवॉच या माध्यमातून मोबाईल क्षेत्रात रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे मार्च २०१९ पर्यंत मोबाईल कंपन्यांमध्ये काम करणाºया ६० हजार कर्मचाºयांना नोकरी गमवावी लागणार आहे. टीमलीज सर्व्हिसेसने केलेल्या सर्वेक्षणातही भीती व्यक्त झाली आहे. मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरणसुद्धा या स्थितीला कारणीभूत असेल.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात इंटरनेट आॅफ थिंग्स व आर्टिफीशीअल इंटेलिजन्स यांचा वापर सातत्याने वाढत आहे. यामुळे दूरसंचार क्षेत्रातील पारंपरिक नोकºयांचे दिवस आता गेले. आता आधुनिक कौशल्य प्राप्त युवक-युवतींना या क्षेत्रात नोकरीची संधी आहे. त्यामुळेच पुढील वर्षभरात या क्षेत्रातील ६० हजार ते ७५ हजार नोकºया संपुष्टात येतील.
नोकर्यांवरील हे संकट २०१९-२० या पुढील आर्थिक वर्षातही कायम असेल. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत आणखी १५ हजार ते २० हजार कर्मचाºयांना नोकºया गमवाव्या लागण्याची शक्यता आहे. आयडीया व व्होडाफोन या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणामुळे २०१७-१८ मध्ये जवळपास १ लाख नोकर्या संपुष्टात आल्या होत्या. आता एअरटेल कंपनी टाटा टेलिकॉम व टेलिनॉरची खरेदी करीत आहे. याखेरीज रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) व एअरसेल पूर्णपणे बंद पडले आहे. यामुळे मोबाइल क्षेत्रातील नोकर्या संकटात आहेत. ग्राहक सेवा, टॉवर व्यवस्थापन, ग्राहक सेवा, सीमकार्ड वितरक यांच्यासह दूरसंचार क्षेत्रात सध्या २५ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी ग्राहक सेवा व आर्थिक क्षेत्राशी संबंधित १५ हजार नोकर्या तात्काळ संपुष्टात येत आहेत.