नवी दिल्ली | संसदेच्या दोन्ही सभागृहात आज एम.करुणानिधी यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला. सरकारने आज एम.करुणानिधी यांच्या निधनामुळे एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. म्हणून संसदेची दोन्ही सदने दिवसभरा साठी तहकूब करण्यात आली आहेत. करूणानिधींचा पक्ष जरी प्रादेशिक असला तरी त्या पक्षाचा दिल्लीच्या राजकारणात मोठा दबदबा राहिला आहे. करुणानिधी यांच्या निधनामुळे दक्षिणेच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
लोकसभेत आणि राज्यसभेत करुणानिधी यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडण्यात आला आणि संसदेचे कामकाज दिवस भरासाठी तहकूब करण्यात आले आहे आहे. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दक्षिणेचा सिने अभिनेता रजनीकांत यांनी करुणानिधी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे.