हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकावरून देशभरात तीव्र पडसाद उमटले आहे. राज्यातही कॉग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादीने या विधेयकाला विरोध केला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता. खासदारांच्या निलंबनावरून त्यांनी अन्नत्याग पण केल होत. पण, दुसरीकडे भाजपचे नेते नितेश राणे यांनी शरद पवार यांच्याबद्दल खळबळजनक वक्तव्य करून राज्याच्या राजकारणात खळबळ निर्माण केली आहे.
कृषी विधेयक जेव्हा राज्यसभेत सादर करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी अध्यक्ष आणि खासदार शरद पवार हे गैरहजर होते. त्यांच्या गैरहजेरीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थितीत केला होता. त्यांच्या प्रश्नाची री ओढत नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत ‘ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है’ असं विधान केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण आल आहे.
तसंच, ‘केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक हे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील शेतकरी सुरक्षित आहे’, असंही नितेश राणे म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’