औरंगाबाद : पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद होण्याची धक्कादायक घटना सिडको परिसरात घडली अाहे. महिला काॅन्स्टेबलच्या मुलीने औरंगाबाद येथील पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेने पोलीस खात्याला शर्मेने मान खाली घालावी लागली आहे. समाजाच्या विविध स्तरांतून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे. एका आय.पी.एस. दर्जाच्या अधिकार्यावर बलात्कारासारखा आरोप होणे ही गंभीर बाब असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हणले आहे. औरंगाबाद येथील घटनेचा सुप्रिया सुळेंनी ट्विटरवरुन निषेध केला आहे. रक्षकच भक्षक झाले तर जनतेने कोणाकडे पाहायचे ? असा सवालही सुळे यांनी ट्विटरवरुन विचारला आहे. गृहखात्याचा वचक नसल्याने अशा विकृती डोकंवर काढत आहेत असं म्हणुन त्यांनी गृहखात्यावर ताशेरे ओढले आहेत. गृहखात्याला स्वतंत्र मंत्री नसल्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी वाढल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न एरणीवर आला अाहे. असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी गृहखात्याला स्वतंत्र मंत्री मिळायलाच पाहीजे अशी मागणी यावेली केली आहे.