राजकारणापलीकडचे रामराजे – सुरज शेंडगे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आज महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.रामराजे नाईक निंबाळकर यांना ऐकण्याचा योग्य आला. निमित्त होत प्रा.रामकृष्ण मोरे यांच्या नावे दिली जाणारा जीवन गौरव पुरस्कार रामराजेंना मिळाला. त्या पुरस्कार वितरण समारंभात रामराजे बोलत होते. आयुष्यभर त्यांनी कृष्णेच्या पाण्यासाठी केलेल्या संघर्षाची गाथा त्यांनी सांगितली त्यातून एक लक्षात आलं की हा माणूस खरा तरमळीचा आहे. ढोंगी बेगडी वगैरे नाही.तसेच त्यांच्या स्वभावातील कौतुकाची आणि नवलाची बाब मला ही वाटली की लोकशाहीत ही राजेशाहीची मस्ती असलेले खानदानी राजे देशात कमी नाहीत परंतु रामराजेंच्या सारखा राजघरण्यातून आलेला प्रचंड श्रीमंत माणूस परंतु तो एवढा जमीनीवर असू शकतो हे अलौकीकच!

त्यांनी फक्त स्वतःच्या जीवनातील संघर्षच व्यक्त नकरता देश प्रश्नाला हात घातले देशातील विषमता,गरिबी,भूकमरी यावर बोलणारे रामराजे देशाचे आजोबा गहीवरत असल्या सारखे भासले. त्यांनी त्यांच्या कॉलेज जीवनातील किस्से सांगितले. शा.म.मुजुमदार त्यांना वनस्पतीशास्त्र शिकवत असत. त्यांना सांजवेळी फर्ग्युसनच्या मागच्या टेकडीवर विद्यार्थ्यांशी गप्पा मारत बसण्यास खूप आवडतं असे. असेच एक दिवशी टेकडीवर बसले असताना रामराजेंनी मुजुमदार सरांना शिक्षण संस्था स्थापण्याचा विचार मांडला, मुजुमदार सरांनी तो सकारात्मक घेतला आणि आज आपण सिम्बॉइसेस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ जे पाहतो त्याची बीजे थेट रामराजेंच्या विद्यार्थी दशेत आहेत.

राजराजेंनी आणखी एक दिलखुलास किस्सा सांगितला तो म्हणजे खा.वंदनाताई चव्हाण यांच्या वडिलांच्या हाताखाली त्यांनी पुणे सत्र न्यायालयात वकिली केल्याचा. रामराजेंनी फौजदारी खटल्याची वकिली केल्याचे सांगितले तसेच त्यांनी फौजदारीची सर्व कलमे तोंड पाठ असल्याचे सांगितले. पुढे त्यांनी सिम्बॉइसेस विद्यापीठात विधी विभागात प्राध्यापकी केल्याचेही सांगितले. कायदा अभ्यासून न्यायालयात युक्तीवाद मांडणे एक अंग असते.कायदा शिकवणे दुसरे अंग असते. आमदार म्हणून कायदा करणे तिसरे अंग असते.सभापती म्हणून कायदा राभवणे हे चौथे अंग असते.या सर्व भूमिकेतून गेल्याचा आपणास अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

रामराजेंनी फलटणच्या प्रियदर्शनी महाविद्यालयात ५वर्ष प्राचार्य म्हणून काम पाहिले. रामराजे १९९१ साली राजकारणात आले. फलटणच्या नगराध्यक्ष पदापासून सुरू झालेला हा प्रवास मंत्रिपद मार्गे विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत येऊन पोहचला आहे. रामराजेंनी देशस्थितीचा ठोकताळा घेत कृष्णा स्थिरीकरणाचा प्रश्न पोटतिडकीने मांडला. महाराष्ट्र जास्तीत जास्त सिंचित झालेला बघणं मला स्वर्गासारखं वाटेल अस ते ह्रदयाच्या तरमळीपासून म्हणाले.

पश्चिम महाराष्ट्रात संपन्नता आली यामागे इथल्या सामान्य जणांचे कष्ट आणि त्याला लोकप्रतिनिधींनी दिलेली जोड आहे हे त्यांनी सांगितले.पुढे ते म्हणाले,”पश्चिम महाराष्ट्रतील सुबत्ता ही इथल्या कसदार लोकप्रतिनिधीची देणं आहे. मला विश्वास आहे प.महाराष्ट्रात पुढील पिढीत ही कसदार लोकप्रतिनिधी सर्वच पक्षातून निर्माण होतील. “खर तर हे वाक्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून राजकारणात जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांना उत्तेजन देणारच होत.

भारतीय लोकशाहीवर ही त्यांनी खूप मौलिक भाष्य केले.तीन पिढ्यांनी ही लोकशाही टिकवून ठेवली आहे त्या पिढीची शक्ती खूप मोठी आहे. “लोकशाहीचा फायदा घेऊन श्रीमंत झालेले मतदानापासून दूर गेले परंतु ज्यांनी हयात गरिबीत घालवली ते मात्र मतदानात हिरहिरीने सहभागी होतात,हा गरिबांचा मोठेपणा आहे.” असे लोकशाहीचे वास्तव टिपत त्यांनी खूप सूचक विधान केले “जास्त विषमता असलेल्या देशात लोकशाही टिकू शकत नाही परंतु भारतात ती टिकली हा इथल्या लोकांचा मोठेपणा आहे.” भारतात मतदानाच्या वेळी लष्कर बोलावलं जाण्याची फार नगण्य उदाहरणे आहेत ही भारतीयांच्या रक्तातील ‘सहिष्णुता’आहे. त्या उदारतेच्या बळावरच भारतीय लोकशाही टिकून असल्याचं ते बोलले.टिळक गोखल्यांच्या ‘सुधारणा की स्वातंत्र्य’ या वादापासून आजही भारतीयांना सुटका मिळालेली नाही आज ही तोच वाद जिवंत आहे सुधारणा की स्वातंत्र्य.आशा शब्दांत त्यांनी लोकशाहीचे चित्र स्पष्ट केले. भ्रष्ट नेत्याबद्दल बोलताना त्यांनी मतदारांना जागरूक करणारे भाष्य केले.भ्रष्ट नेत्यांना तुम्हीच निवडून देता आणि तुम्हीच त्यांना शिव्या देता. “लोकशाहीच्या मंदिराचा नेता कळस असला तरी पाया ही सामान्य जनता आहे तो मजबूत करण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे.” असे ते म्हणाले. शेवटी त्यांनी आगामी राजकीय पिढीबद्दल विश्वास आणि आशावाद व्यक्त केला आणि पुरस्काराच्या संयोजकांना सांगितले की आम्हा म्हातारांना पुरस्कार देण्यापेक्षा राजकारत हिरहिरीने लोकांची कामे करणाऱ्या तरुणांना पुढच्या वर्षीपासून पुरस्कार द्या कारण त्यांच्या खांद्यावर उद्याच्या भारताची धुरा आहे. पुरस्कारात मिळालेली २५हजारांची रक्कम एका गरीब विद्यार्थ्यास देण्याचे घोषित करून त्यांनी वाणीस विराम दिला आणि कार्यक्रम संपताच त्या विद्यार्थ्यास ती रक्कम सुपूर्द केली. रामराजेंच्या आजच्या निपक्ष भाषणाने मी मंत्रमुग्ध झालो आहे म्हणून हा एवढा वृत्तात शब्दांकित करण्याचा अट्टहास केला.रामराजेंच्या सारखे सभापती महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ सभागृहास लाभले आहेत हे महाराष्ट्राचे भाग्य आहे.

सुरज शेंडगे

Leave a Comment