नवी दिल्ली | लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा अशी लक्षवेधी सूचना खा.धनंजय महाडिक यांनी लोकसभेत मांडली आहे. आज आरक्षणाच्या मुद्द्यावर रान तापत असताना शाहू महाराजांनी आरक्षणाची गरज शंभर वर्षा पूर्वी ओळखली होती असे महाडीक यावेळी लोकसभेत बोलताना म्हणाले. तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ही शाहू महाराजांनी मदत केली असल्याचा उल्लेख धनंजय महाडिक यांनी लक्षवेधी सुचना मांडताना केला आहे.
काय असते लक्षवेधी सूचना?
लक्षवेधी सूचना म्हणजे संविधानाने संसद सदस्याला दिलेले महत्वाचे आयुक आहे. लक्षवेधी सुचने द्वारे संसद सदस्य देशातील कोणत्याही महत्वाच्या विषयावर सरकारचे लक्षवेधू शकतो. संसद सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सुचनेची सरकारला गंभीर दखल घ्यावी लागते. संसदीय कामकाजाचा नियम ३७७ नुसार लक्षवेधीचा अधिकार संसद सदस्यांना प्रधान करण्यात आला आहे. तसेच लक्षवेधी सूचना मांडल्या बरोबर लगेच उत्तर द्यायला सरकार बांधील नसते.