मुंबई | एलटीटीचा संस्थापक आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मारेकरी व्ही. प्रभाकरन याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे फलक मुंबईत लागला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलुंड येथील मेहुल टॉकीज परिसरात सदर फलक झळकले असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हे फलक नाम तमिळ कच्ची, नाम तमिलर पार्टीने लावले आहेत. तामिळ भाषेतल्या या फलकावर सर्व तमिळींना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाम तमिळ कच्ची पक्षाचा कुठल्याही नेत्याचे नाव फलकावर नाही. एका बॅनरखाली मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. मुलुंड पोलिसांनी फलक उतरवले असून दोघांवर कारवाई केली आहे.
या संदर्भात उल्लेखनीय आहे की स्वतंत्र तमिळच्या मागणीसाठी व्ही. प्रभाकरन याने एलटीटी या संघटनेची १९७६ साली स्थापना केली होती. तब्बल 32 देशांनी प्रभाकरन याच्या संघटनेला आतंकवादी संघटना म्हणून घोषित केलं होतं. 18 मे 2009 साली श्रीलंकन सैन्यासोबत झालेल्या चकमकीत प्रभाकरन ठार झाला.