मुंबई | दुधाचे आंदोलन अखंडित सुरू असताना आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यावर सखोल वार्तालाप झाला. मे आणि जून महिन्यात सरकारने दूधसंघांना दूध पावडरीसाठी अनुदान दिले. त्या काळात ही दुधाचे दर वाढले नाहीत उलट दोन रुपयांनी दर कमी झाला. मे आणि जून महिन्यात दिलेले ५३ कोटी रुपयांचे अनुदान पाण्यात गेले असे शेट्टी म्हणाले.
राजू शेट्टींचा नवीन तोडगा
सरकारला पाच रुपये अनुदान बँक खात्यात जमा करणे शक्य नसेल तर सरकारने शेतकऱ्यांना २६ रुपये दुधाला दर दिला पाहिजे. तसेच दूध भुकटी ला येत्या सहा महिन्यासाठी ७५ रुपये प्रति किलो अनुदान दिले गेले पाहिजे.
सरकारने मला चर्चेला बोलवावे असे माझे म्हणणे नाही मला नबोलावता हा निर्णय घेतला तरी चालेलं असे राजू शेट्टी म्हणाले.
दरम्यान ना.गिरीश महाजन यांच्या सोबत राजू शेट्टी यांनी काल रात्री उशिरा पर्यंत चर्चा केली परंतु कसलाच तोडगा निघाला नाही. आज पत्रकार परिषद घेऊन राजू शेट्टी यांनी नवी भूमिका स्पष्ट केली आहे.