बुलढाणा प्रतिनिधी। लोणार तालुक्यातील राज्यमहामार्गावर युवकाचा संशयस्पद मृतदेह आढळलाय. मात्र हा अपघात की घातपात हे अजून कळायला मार्ग नाही. तालुक्यातून गेलेल्या नागपूर-मुंबई राज्यमहामार्गावर बिबी गावानजिक विजवितरण उपकेंद्राजवळ पिप्रीं खंदारे शिवारात संजय सानप या इसमाचा मृतदेह आढळून आल्यान एकच खळबळ उडालीये.
या घटनेविरोधात मृतकाच्या भावाने बिबि पोलिसात तक्रार दिली आहे. माझ्या भावाचा खून केला गेला असल्याचा त्यांनी संशय घेत त्यांनी संशय म्हणून काहींची नावेही नमूद केली आहेत. या तक्रारीवरून बिबी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. बिबी पोलीस स्टेशनन प्रथम दर्शनी मार्ग नंबर २२ पब्लीक १९ / १७४ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
तेव्हा हा अपघात कि घातपात याबाबत तपास करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.