राज्य निवडणूक आयोगातर्फे आजपासून आंतरराष्ट्रीय परिषद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | भारतीय संविधानातील 73 आणि 74 व्या दुरुस्तीच्या रौप्य महोत्सवानिमित्त राज्य निवडणूक आयोगातर्फे आज पासून मुंबई येथे ‘सुदृढ लोकशाहीसाठी निकोप निवडणुका’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे.

या परिषदेचे उद्घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते होणार असून, या परिषदेला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील प्रमुख पाहुणे असतील. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 26 ऑक्टोबर 2018 रोजी दुपारी 2.30 वाजता या परिषदेचा समारोप होईल.

Leave a Comment