पुणे | राज ठाकरे पुणे दौऱ्याला आले असून पक्ष बांधणीसाठी हा दौरा असल्याचे बोलले जाते आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. राष्ट्रीय पक्षांचे मुख्यमंत्री हे बसवलेले मुख्यमंत्री असतात.त्यांना निर्णय घेताच येणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री मराठा आरक्षणाचा मुद्दा दसाला लावू शकणार नाहीत असा सणसणीत टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण दूषित झाले असून लहानगी मुलं पण जातीवाचक बोलू लागली आहेत. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे असा जातीवाद जोपासून महाराष्ट्राचा बिहार करण्याचा आहे का असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.
हरामखोर राजकारण्यांसाठी काकासाहेब शिंदे सारख्या गरिबांचे बळी जाता कामा नये. राजकारणाच्या भूलथापांना बळी पडू नका असे राज ठाकरे म्हणाले.
पुणे येथील बालगंधर्व रंग मंदिरात भरलेल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. मागच्या महिन्यात उद्धव ठाकरे पक्ष बांधणीच्या दौऱ्याला पुण्याला आले होते. तीच री राज ठाकरेंनी ओढली असून पक्ष बांधणीचा दौरा पुण्याला आणला आहे. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणूकाही केल्या आहेत.