मुंबई | शुक्रवारी मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वासाच्या ठरावावर भाषण केल्यानंतर एक ऐतिहासिक कृती राहुल गांधी यांनी केली. ते मोदींच्या आसनाकडे गेले आणि त्यांनी मोदींना मिठी मारली. या घटनेबद्दल माध्यमात तसेच राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उत आला असताना मुंबई कॉग्रेसने त्यांच्या भाषणातील एक वाक्य ठळक करून फ्लेक्सवर छापले आहे. राहुल गांधींच्या पाठींब्यात हे फ्लेक्स झळकवण्यात आले आहेत.
शुक्रवारी अविश्वासाच्या ठरावावर बोलताना “तुम्ही माझ्या वर टीका केली तरी चालेल मला शहजादा म्हणलं तरी चालेल.मला पप्पू म्हणले तरी चालेल.तुम्ही असे म्हणले तरी माझ्या मनात तुमच्या बद्दल प्रेमच राहील. कारण मी कॉग्रेस आहे.” असे राहुल गांधी म्हणाले होते.
मोदींना उद्देशून बोलताना, तुमच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार आहे. राग आहे, द्वेष आहे पण माझ्या मनात तुमच्या बद्दल फक्त प्रेम आहे आणि मी प्रेमानेच जिंकणार आहे” असेही राहुल गांधी म्हणाले होते. नेमका याच भाषणाचा धागा पकडून मुंबई कॉग्रेसने राहुल गांधींच्या समर्थनार्थ फ्लेक्स झळकवले आहेत. नरेंद्र मोदींना मिठी मारणे हा सुद्धा राजकिय डाव होता असे मत राजकिय वर्तुळात व्यक्त केले जाते आहे.