राहुल गांधीचे तिहेरी तलाकच्या विरोधात महिला आरक्षणाचे अस्त्र

thumbnail 1531734003624
thumbnail 1531734003624
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | आजमगड येथील जाहीर सभेत मोदींनी तिहेरी तलाकच्या मुद्दयावर सणसणीत टीका केली होती. याला उतारा म्हणून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महिला आरक्षणाचे विधेयक लोकसभेत आणावे त्यास आम्ही पाठिंबा देतो असे सांगितले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांना महिला आरक्षणा संदर्भात पत्र लिहीले आहे. ‘लोकसभेच्या मान्सून अधिवेशनामधे सत्ताधारी भाजपने महिला आरक्षणाचे विधेयक पास करावे’ असे गांधी यांनी पत्रामधे म्हटले आहे. काँग्रेस भाजपाला त्यासाठी पुर्ण पाठिंबा देण्यास तयार असल्याचेही राहुल गांधी यांनी ट्विट करुन नमुद केले आहे.

तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर कॉग्रेसची वाताहत करण्याची रणनीती भाजपने आखली असतानाच राहुल गांधींनी महिला आरक्षणाचा मुद्दा काढून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘संसदेत आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमधे महिलांना ३३ % आरक्षण मिळायला हवे आहे’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यापूर्वी मागील वर्षी मा.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहून पाठींब्याची मदत मागीतली होती.

१९९६ साली देवेगौडा यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात महिला आरक्षणाचे विधेयक संसदेत सादर केले गेले होते. नंतर २०१० साली सदर विधेयक राज्यसभेत पास झाले. परंतु लोकसभेत ते अजून पास होऊ शकलेले नाही. संविधानाच्या ७३ व्या आणि ७४ व्या घटनादुरुस्तीने पंचायत समिती व नगर परिषदांमधे महिलांना ३३ % आरक्षण देण्यात आले आहे.

https://platform.twitter.com/widgets.js