मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. जळगावमधे अल्पवयीन मुलांना विहीर पोहोल्याच्या कारणावरुन नग्न करुन मारहाण करण्यात आली होती. जामनेर तालुक्यातील वाकडी गावामधे हा प्रकार घडला होता. त्या घटणेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. राहुल गांधी यांनी सदरील घटनेचा निषेध करत तो व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. परंतु राहुल यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत त्या मुलांचे चेहरे दिसत असून त्यांची ओळख उघड होत आहे असा आरोप करत महाराष्ट्र बालहक्क आयोगाने राहुल गांधींना नोटीस पाठवली आहे. बालहक्क कायद्यातील कलम ७૪ नुसार आणि पोक्सो कायद्याच्या २३ व्या कलमानुसार राहुल यांनी कायद्याचे उल्लंखन केले असल्याचे नोटीसीत म्हणले आहे. तसेच दहा दिवसांव्या कालावधीत नोटीसीला उत्तर देण्याचा आदेशही देण्यात आला आहे.