रुसलेला ‘वरूणराजा’ धो-धो बरसला; शेतकऱ्यांना मोठा दिलासा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिंगोली प्रतिनधी । शहरात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावलीये. गेल्या २ दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल होते. पण पाऊस काही पडत नव्हता. मात्र आज दुपारपासून रुसलेला वरुणराजा धो-धो बरसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा तरी दिलासा मिळाला आहे.

पावसाने दमदार हजेरी लावल्याने, शहरात रस्त्यांवर असलेल्या खड्यात पाणी साचल होते, दरम्यान अचानक आलेल्या पावसान नागरिकांची देखील धांदल उडाली होती. पावसाचा जोर चांगला असल्यानं सर्वत्र पाणीच पाणी पहावयास मिळत होते. या पावसान खरिप पिके धोक्याबाहेर निघण्याची शक्यता आहे.

गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीच्या आदल्यादिवशी जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. विसर्जनाच्या दिवशीही दिवसभर ढग दाटून आले होते, आणि नंतर पाऊसही बरसला. त्यामुळे नागरिकांनी गणपती बाप्पाला अगदी जल्लोषात जड अंतःकरणानं निरोप दिला.

इतर महत्वाच्या बातम्या –

दुष्काळाचं सावट दूर होऊ दे.. असं साकडं घालत गणरायाला निरोप..!

जो पर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत विसर्जन नाही, शेतकर्‍यांचे बाप्पासमोरच उपोषण

पक्षाने उमेदवारी दिली तर लढेन -शिवसेना प्रवेशानंतर ‘भास्कर जाधव’ यांची प्रतिक्रिया

शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपच्या या नेत्याने केली आपल्या उमेदवारीची घोषणा

कट्टर शिवसैनिक असल्याने मन स्वस्थ बसू देत नव्हतं ; शिवसेना प्रवेशावेळी भास्कर जाधवांचे उद्गार