रोहित पवारांचा पराभव घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांची नवीन रणनीती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कर्जत प्रतिनिधी | शरद पवारांचे नातू रोहित पवार हे विधानसभा निवडणुकीला कर्जत जामखेड मतदारसंघातून सामोरे जाणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. या मतदारसंघात त्यांचा विजय सोपा नसणार आहे. कारण या मतदारसंघात त्यांना राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्ये कडवे आव्हान असणार आहे. त्यामुळे ते नेमके कोणत्या शक्यतेवर विजयी होणार हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगणे सध्या कठीण जात आहे. अशातच रोहित पवार यांना पराभूत करण्याची नवीन रणनीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आखली आहे.

मुख्यमंत्र्यांनी राम शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना पुढे मंत्री तर करूच पण जेवढे जास्त मताधिक्य तेवढे चांगले खातेही देऊ, असे वक्तव्य करत शिंदे यांच्या विजयासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच जामखेडसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याचे जाहीर करून तसा आदेशही दिला असल्याने रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ केली आहे.

लोकसभा निडवणूकदरम्यान मावळमध्ये ज्याप्रमाणे राजकीय समीकरणे बदलली त्याचप्रमाणे कर्जत-जामखेडमध्येही तशीच पुनरावृत्ती व्हावी अशी योजना भाजपतर्फे आखण्यात येत आहे .कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित यांची निवडणूक राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. रोहित यांचे मतदारसंघांमध्ये दौरे आणि संपर्कही वाढविला आहे. तर कर्जत-जामखेडमध्ये पालकमंत्री राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर करत भाजपही नेवे डावपेच आखात आहे.

Leave a Comment