हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लातूर जिल्ह्याचे विभाजन करून उदगीर जिल्ह्याची निर्मिती करण्याचे प्रयत्न प्रशासकीय पातळीवर सुरु झाले आहेत. लातूर जिल्ह्याचे विभाजन होऊन उदगीर या नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास उदगीर हा महाराष्ट्रातील ३७ वा जिल्हा ठरेल. या आधी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. पालघर हा ३६ वा जिल्हा ठरला.
उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करून १६ ऑगस्ट १९८२ रोजी लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. आता लातूर जिल्ह्याचेही विभाजन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.सध्या लातूर जिल्ह्यात लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ, अहमदपूर आणि उदगीर असे दहा तालुके आहेत.लातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ ७,१५७ चौरस किमी इतके आहे.
यापूर्वी झालेली जिल्हा विभाजने
औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्हा वेगळा केला – १ मे १९८१
उस्मानाबाद मधून लातूर वेगळा केला – १६ ऑगस्ट १९८२
चंद्रपूर मधून गडचिरोली वेगळा केला – २६ ऑगस्ट १९८२
बृहमुंबई जिल्ह्यातून मुंबई उपनगर जिल्हा वेगळा केला – ४ ऑक्टोंबर १९९०
अकोला जिल्ह्यातून वाशीम वेगळा केला – १ जुलै १९९८
धुळे जिल्ह्यातुन नंदुरबार वेगळा केला – १ जुलै १९९८
परभणी जिल्ह्यातून हिंगोलीची निर्मिती केली – १ मे १९९९
भंडारा जिल्ह्यातून गोंदियाची निर्मिती केली – १ मे १९९९
परभणी जिल्ह्यातून हिंगोली निर्माण केला – १ मे १९९९