पटना | कॉग्रेसचे राष्ट्रीय संघटन महासचिव अशोक गेयलोत यांनी लालू प्रसाद यादव यांची घरी जाऊन भेट घेतली आहे. २०१९ च्या निवडणुकांची तयारी करण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दौरा केला आहे. एकुण चार घोटाळे नावावर असलेले आणि त्यासाठी एकत्रित शिक्षा भोगणारे लालू प्रसाद यादव सध्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने अस्थायी स्वरुपाच्या जामिनावर बाहेर आहेत. २००९ साली लालू प्रसाद यांच्या राजद आणि कॉग्रेसची आघाडी तुटली होती. तेव्हापासून बिहार विधानसभेच्या निवडणुकापर्यंत ही आघाडी होऊ शकली नाही. विधानसभा निवडणुकीतील ही आघाडी लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा अबाधित राहावी असा कॉग्रेसचा मनसुबा आहे. त्या अनुषंगाने गेहलोत आणि लालू यादव यांच्यात बोलणी झाल्याचे समजत आहे. राजद ने आपला निर्णय राखून ठेवला आहे. परंतु कॉग्रेसने बिहारच्या ४० जागी लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.