लखनौ : उत्तर प्रदेशच्या मुख्यसचिव पदी अनुपचंद्र पांडे यंची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तेरा वरिष्ठ आय.ए.एस. अधिकार्यांना डावलून पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी पांडे औद्योगिक विकास महामंडळाचे आयुक्त म्हणून काम पाहत होते. अनूप चंद्र पांडे १९८४ सालच्या आय.ए.एस. बॅचचे अधिकारी असून त्यांनी राज्याचे वित्त सचिव म्हणूनही जबाबदारी निभावली आहे. कडक शिस्तीचे अधिकारी आणि काम तडीस लावणारा प्रशासक म्हणून अनुप चंद्र पांडे यांचा राज्यात लौकिक आहे. उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निकटवर्तीय म्हणून पांडे यांची ओळख आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या सलगीतूनच त्यांची निवड झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या मुख्य सचिव पदाबरोबर औद्योगिक विकास महामंडळाच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभारही पाडे यांच्यावर सोपावण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव म्हणून अनुप चंद्र पांडे उद्या रविवारी सायंकाळी ५ वाजता पदभार स्वीकारणार आहेत.
Home ताज्या बातम्या वरिष्ठ अधिकार्यांना डावलून अनुपचंद्र पांडे यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यसचिव पदी नियुक्ती