वर्ल्ड यूथ समिटसाठी डॉ. मनीषा पाटील यांची निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | नवी दिल्ली येथे शुक्रवारी होणाऱ्या वर्ल्ड युथ समिटमध्ये बोलण्यासाठी डॉ. मनीषा पाटील यांची निवड झाली आहे. रूरल गर्ल्स एम्पावरमेंट – अ चॅलेंज इन अचिव्हिंग एडिजीएस बाय २०३० या विषयावर उपस्थित श्रोत्यांना त्या मार्गदर्शन करतील. ६० देशांतून आलेल्या ३००० अर्जांमधून ५ व्यक्तींची निवड करण्यात आली असून डॉ. मनीषा पाटील त्यातील एक आहेत.

मनीषा या साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये इंग्रजी विभागप्रमुख पदावर कार्यरत आहेत. आपल्या सेवेच्या सुरुवातीपासूनच त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी विषयाचा न्यूनगंड कमी करण्यासोबतच, चौकटीबद्ध अभ्यासक्रमाच्या पलीकडे जात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा म्हणून प्रयत्न केले. महाविद्यालयीन जीवनात काळानुरूप आवश्यक इंग्रजी आणि समाजात वावरताना आवश्यक असणारी जीवनकौशल्ये शिकवण्यावर त्यांचा प्रामुख्याने भर असतो. भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करणाऱ्या मनीषा पाटील यांच्या निवडीमुळे साताऱ्याच्या आणि रयत शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

महाविद्यालयीन जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच त्यांना युनायटेड किंगडममधील इएलटी रिसर्च पार्टनरशीप अवॉर्ड, अमेरिकेमधील ब्रायडन शिष्यवृत्ती, कॅनडातील इंटरनॅशनल शॉ सोसायटीची ट्रॅव्हल ग्रँटही मिळाली आहे. सातारा जिल्ह्यातील महिला हिंसाचाराच्या प्रश्नावर त्यांनी तीन प्रकल्प पूर्ण केले असून याला राज्य महिला आयोगाचे अनुदानही मिळाले आहे.

विद्यार्थ्यांनी रचनात्मक काम करत असताना मूलभूत कौशल्य अंगिकरण्यावर भर द्यायला हवा. मुलींनी धाडसाने आपल्या शिक्षणासाठी कुटुंबीयांकडे हट्ट धरून शिक्षणाच्या नवनवीन प्रवाहात उतरण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही काम करत जाता त्यावेळी तुम्हाला येणाऱ्या अडचणींवर मार्ग निघतोच हा मौलिक संदेश त्यांनी या निवडीनंतर दिला.

1 thought on “वर्ल्ड यूथ समिटसाठी डॉ. मनीषा पाटील यांची निवड”

Leave a Comment