परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे रविवारी पिसाळलेल्या कुत्र्यांने धुमाकूळ घालत आठ जणांना चावा घेतलाय. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी डॉक्टर नसल्यामुळे सर्वांना परभणीत ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रविवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गावातील झोपडपट्टी येथे 2 बालकांना ,शेत वस्ती येथे 2 व गावात 2 बालकास पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. सर्व बालके तीन ते सहा वयोगटातील आहेत. त्यामध्ये तीन मुलीं आहेत . पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गावातील लोकांनी उशिरापर्यंत प्रयत्न केला असून पिसाळलेला कुत्रा साडेपाच वाजण्याच्या दरम्यान मारण्यात आला.
गावामध्ये डॉक्टर व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी नसल्याने ,चावा घेतलेल्या सर्वांना परभणी ग्रामीण रुग्णालय मध्ये ॲम्बुलन्स द्वारे हलवण्यात आलंय. चावा घेतलेल्या रुग्णांमध्ये आरशान पठाण , शिवानी यादव, भक्ती सवणे, काशीनाथ सवणे, वैष्णवी शेळके या बालकांसह जीवन घुंंबरे या तरुणाचा समावेश आहे. परभणीत उशीरापर्यंत डॉक्टर रुग्णांवर उपचार करत होते. याशिवाय दोघेजण खाजगी दवाखान्यात उपचारासाठी गेल्याचे गावकऱ्यांनी सांगितल आहे.
गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असुनही निवासी डॉक्टर व कर्मचारी नसल्याने रुग्णांना नेहमीच तालूका व जिल्हाच्या ठिकाणी जाव लागत असल्याचेही स्थानिकांचे म्हणने आहे आजही. सदरील रुग्ण दवाखान्यात गेले असता, प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप होते . याबद्दल गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे .