विघ्नहर्त्यानेच पाठवले देवदूत

Ganesh Festival
Ganesh Festival
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | सुनिल शेवरे

श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्या वतीने दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी शहराच्या विविध ठिकाणी मोफत आपत्कालीन आरोग्य सेवा व रुग्णवाहिनी सेवेचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी ट्रस्टच्या वतीने कोथरूड गणेश विसर्जन समितीच्या सहकार्याने नळस्टॉप चौक येथे तसेच मॉडर्न विकास मंडळाच्या सहकार्याने विजय टॉकीज चौक येथे या व्यवस्थेबरोबर मिनी हॉस्पिटलचे आयोजन करण्यात आले. तसेच शरीरातील अवयवांचे कट आउट करून अवयवदान मोहीमेची जनजागृती करण्यात आले.

या उपक्रमामध्ये डॉ. राजेंद्र खेडेकर यांसह डॉ. संदीप बुटाला, डॉ. धर्मेंद्र शहा, डॉ. ज्ञानेश्वर शेळके, डॉ. मनोज मढवी, डॉ. ज्योती निकम, डॉ. तुषार जगताप यांनी काम पाहिले. दिवसभरात डोकेदुखी , ताप, अंगदुखी, चक्कर येणे, घाम सुटणे, घाबरल्यासारखे होणे , ठेच लागणे यांसारखे जवळपास १३० हुन अधिक रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले.

दुपारी ४ च्या सुमारास कु. अस्मिता कुलकर्णी ( २५ वर्ष ) ही गरुड गणपती या ठिकाणी मिरवणुकीचा आनंद घेताना खिडकीची तुटलेली काच अचानक तिच्या डोक्यात पडून तिच्या डोक्याला , चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यावेळी डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी प्रसंगावधान राखून आपल्या रुग्णवाहिनीचे वाहक शत्रुग्न ओजरकर याना घेऊन सदर मुलीला त्वरीत रुग्णवाहिनीतून ३ मिनिटात गर्दीतुन वाट काढत पूना हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. रुंगवाहिनीमध्ये रक्तस्त्राव थांबवण्यासाठी केलेले उपचार व वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचवल्याने अस्मिताच्या जीवावर आलेले संकट टळल्याने तिच्या वडिलांनी साक्षात विघ्नहर्त्यानेच देवदूत पाठवल्याची भावना व्यक्त केली.