विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! JEE Main 2020 परीक्षेचा अर्ज भरण्याची पुन्हा एक संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील आयआयटींमधील अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा JEE Main ला अर्ज करायचा राहिला असेल तर त्वरा करा, आणखी एक संधी चालून आली आहे. जे विद्यार्थी कुठल्या कारणाने जेईई मेन्ससाठी अर्ज करू शकले नाहीत, त्या सर्वांना पुन्हा एक संधी देण्यात आली आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी केली आहे. JEE Main परीक्षेचा अर्ज करण्याचं राहून गेलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

पोखरियाल यांनी ट्विटमध्येही म्हटलं आहे की ‘ज्या विद्यार्थ्यांनी परदेशी जाऊन शिक्षण घेण्याची योजना रद्द केली आहे, त्यांना भारतात राहून शिक्षण घ्यायची संधी दिली जात आहे. मी नॅशनल टेस्ट एजन्सीला सल्ला दिला होता की अशा विद्यार्थ्यांना जेईई मेन २०२० ला बसण्याची एक संधी मिळायला हवी.’

एनटीएद्वारे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार जेईई मेन २०२० साठी अर्ज करण्याची लिंक पु्न्हा सक्रीय करण्यात आली आहे. १९ मे २०२० पासून ही लिंक अक्टिव्ह झाली आहे. विद्यार्थी आजपासूनच १९ मे पासूनच अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्जांची अखेरची तारीख २४ मे २०२० आहे. लक्षात घ्या की जेईई मेन २०२० परीक्षा देण्याची ही अखेरची संधी आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगासमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. विमान सेवा बंद आहेत. अनेक परदेशी विद्यापीठांची दारं बंद आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं होतं त्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. या विद्यार्थ्यांना जर असे वाटत असेल की देशातच जेईई द्वारे अभियांत्रिकीची पदवी मिळवावी तर या विद्यार्थ्यांना ही एक सुवर्णसंधी आहे.

Jee Main च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

maharashtra times

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment