बेगुसराय : बिहारमधील बेगुसराय मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह बेताल वक्तव्य करून नेहमीच चर्चेत राहतात. आज पुन्हा त्यांनी बेताल वक्तव्य केलेले आहे. मिशनरी शाळांमधून शिक्षण घेतल्यानंतर परदेशात जाणारे बहुतेक भारतीय गोमांस खायला लागतात. असे होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी खासगी शाळांमध्ये गीता श्लोक शिकवावेत,शाळांमध्ये मंदिरे बांधली पाहिजेत, असे वक्तव्य गिरीराज सिंह केले आहे.गिरीराज भागवत कथेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर आपली मते व्यक्त करत होते.
खासगी शाळांमध्ये मुलांना गीतेतील श्लोक शिकवण्याची आवश्यकता आहे. तसेच शाळेत मंदिरेही बांधली पाहिजेत. याचे कारण म्हणजे मिशनरी शाळांमध्ये मुले शिक्षणाद्वारे डीएम, एसपी आणि अभियंता बनतात, परंतु तीच मुले परदेशी जातात आणि गोमांस खातात. त्यांना संस्कार मुळीच मिळत नाहीत. म्हणून लहान मुलांना शाळेत गीता आणि हनुमान चालीसा शिकवायला हवेत, असे गिरीराज म्हणाले.