सातारा प्रतिनिधी | पाटण विधानसभा मतदार संघात शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांनी पाच वर्षात तब्बल 1766 कोटी 79 लाख 12 हजार रुपयांचा मंजूर निधी आणला असुन गत निवडणुक जाहिरनाम्यात दिलेल्या अश्वासनापेक्षा कितीतरी जादा विकास कामे केली आहेत. आमदार शंभुराज देसाईंनी मतदार संघात मंजुर निधीचा व केलेल्या विकासकामांचा गाववार तपशिलवार 26 पानी जाहिरनामा तयार केला असुन, जेष्ठ नागरिक आणि मतदारांच्या हस्ते तो प्रकाशित केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सहकार्यातून पाटण विधानसभा मतदार संघात 1766 कोटी 79 लाख 12 हजार रुपयांची मंजूर कामे , 108 कोटी 10 लाख 54 हजार रुपयांचा प्रस्तावित निधी असा एकूण 1874 कोटी 89 लाख 66 हजार रुपये निधी आणू शकलो. याचे समाधान असुन विधानसभा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आणखी अपेक्षित निधी आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पाटण मतदार संघातील जनता या कामाचा नक्कीच विचार करेल अशी प्रतिक्रिया आमदार शंभूराज देसाई यांनी दिली.