हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । सध्या कोरोनाच्या काळात अनेक ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा कमी पडत आहे. कोरोनामुळे सर्वत्र जीवन विस्कळीत झाले. ऑक्सिजनची तपासणी करण्याकरता अनेक अँप सध्या सोशल मीडियावर उपलब्ध आहे. अनेक मेसेज मध्ये सांगितलं आहे कि, कोरोना काळात तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी योग्य असणे गरजेचे आहे. त्यानुसार ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी वेगळ्या अँप चा वापर करा . अशी माहिती दिली गेली आहे. परंतु ऑक्सिजन ची पातळी तपासण्यासाठी मोबाइल अँप चा वापर करणे घातक ठरू शकत आहे. अशी माहिती सायबर क्राइम च्या आयजी यशस्वी यादव यांनी सांगितलं आहे.
व्हाट्सअप वर अनेक प्रकारच्या लिंक येत आहेत. त्यावर शकतो क्लिक करू नये. जोपर्यंत तुम्ही त्याला सगळ्या गोष्टीची परमिशन द्याल तेव्हा ते अँप सुरु होईल. परंतु त्यातून आपल्या मोबाइल बदल माहिती घेतली जात आहे. हा व्हाटसअँप मेसेज एक अर्धसत्य आहे. कारण संशोधनाने असे सिद्ध झालं की , कोणतेही अँप इतकं परफेक्ट नाही कि , रक्तातील ऑक्सिजनची पातळी योग्यरीत्या मोजू शकते . अशा वेगवेगळ्या ॲप्सवर विश्वास ठेवणे लोकांसाठी घातक ठरू शकते, असं त्यांनी सांगितलं.
कोणत्याही पद्धतीचं हेल्थकेअर अँप हे वापरकर्त्याच्या आरोग्य विषयक माहिती देणे, डॉक्टरची ऑनलाईन सल्लामसलत करणे आणि फिटनेस बद्ल माहिती देणे या गोष्टी करण्यासाठी मदत करतात. जरी हे हेल्थकेअर ॲप वापरकर्त्याला आरोग्यविषयक माहिती देत असतील. तरीदेखील वापरकर्त्याचा खाजगी डाटा हा ॲपद्वारे घेतला जातो. कोणतेही ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी सर्वात प्रथम डेवलपर रेटिंग, रिव्ह्यू, बग्ज आणि टोटल डाउनलोड हे तपासून घेणे गरजेचे आहे. ॲप डाऊनलोड केल्यानंतर अँप ने मागितलेल्या सगळ्या परमिशन काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत आणि गरज नसल्यास कोणत्याही गोष्टीसाठी परवानगी देऊ नये. डाऊनलोड करण्याआधी पुरेपुर काळजी घेणे गरजेचे आहे.सिक्युरिटी असलेलेच ॲप घेणे गरजेचं आहे.