शिराळा विधानसभा मतदारसंघ लढवणारच- सम्राट महाडिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी। शिराळा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे. तिकीट मिळाल तर ठिक अन्यथा अपक्ष निवडणूक लढवणारच आहे. कोणत्याही परिस्थितीत यंदा माघार नाही. असा इशारा सम्राट महाडीक यांनी दिला. कासेगाव येथे वनश्री नानासाहेब महाडिक प्रेमींनी आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्याप्रसंगी सम्राट महाडीक बोलत होते.

वाळवा तालुक्यातील ४८ गावातील नानासाहेब महाडीक प्रेमींचा प्रचंड मोठा जनसागर उपस्थित होता. प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कर्मभूमीतुन आणलेल्या निर्धार ज्योतीचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सम्राट महाडीक म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून आमदारकी, खासदारकीला भाजपाला निस्वार्थी पाठींबा दिला. प्रसंगी कार्यकर्त्यांना जाजोजागी माघार घ्यावी लागली. नानासाहेब प्रेमींचा आग्रह असल्याने मी शिराळा विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे तिकीट मागणी केली असुन पक्षाने ती दिली तर ठिक अन्यथा महाडिक प्रेमींच्या बळावर अपक्ष निवडणूक लढवणार आहे. राहुल महाडीक म्हणाले, नानासाहेबांनी प्रत्येक निवडणूकीत विरोधी पक्षांच्या उमेदवारांना मदत करण्याची भूमिका घेतली होती. परंतु आमच्या घरातील उमेदवारीला विरोध करण्याचेच काम त्यांनी केले आहे.

त्यामुळे आता कुणाकडूनही मदतीची अपेक्षा न करता महाडिक प्रेमींच्या आग्रहा खातर ही विधानसभा लढवण्याचा निर्धार केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान नानासाहेबांच्यावर प्रेम करणार्‍या जनसमुदाला संबोधित करताना राहुल महाडीक भावनाविवश झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आपसुकच अश्रू तरळले. त्यानंतर समुदायाने नानासाहेबांच्या घोषणांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत सम्राट महाडिक यांना आमदार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Comment